Bhalod Images Collage

Bhalod Images Collage

जळगाव जिल्ह्यामध्ये काही शब्द

*जळगाव* *जिल्ह्यामध्ये असे काही  शब्द आहेत की, जे जगाच्यापाठीवर तुम्ही कुठेही जा तुम्हाला ऐकाला मिळणार नाहीत.*🤗🙏🏻

ल्हिव😝 (लिहीने)

भगुणं😝 (पातेलं)

चिच्चा😆(चींच)

चीचोरी 😆 (चिंचेच्या बिया)

गोरा😝 ( वासरू)

हेला 😝(म्हैशिच पिल्लू)

शिलगाव  😝( पेटव)

च्या 😝(चहा)

वझ😝 (ओझे)

गबस😝 (गप्प बस)

जनावर😝😝😝😝 (साप)

कवासनं😆(केव्हा पासुन )

झगड😆(भांडणे)

इचार😝 (विचारणे)

निवद 😝(नैवेद्य)

हान /चमकाड 😝(मार)

डांग😝 (फांदी)

लज्गरी😆(लक्जरी बस)

झाडनी😆(झाडू)

वयका बर😝 (ओळखा पाहू)

याद नी😝 (आठवेना)

पयाड😝 (पळव)

हान😝 (मार)

रगात😝 (रक्त)

गूच्चूप😝 (चिडी चुप)

ढोपार फुडीन😆(कोपर फोडीन)

धाकला 😝(लहान )

बानट😝 (वेडपट)

इतलूस😝 (थोडे)

कुढी व्हता😝 (कोठे होतास)

तढी😆 ( तिथे)

या पाइले😆 (या वेळी)

गयरं😆(खूप)

ट्याक्टर😆(ट्रँक्टर)

आढी😆(इथे)

आईतवारी😆 (रविवार)

सोमार😆 (सोमवार)

फफूटा😆 (धूळ)

पोया😆 (पोळ्या )

डोल😆(मोठी बादली)

घी ये 😆 (घेऊन ये)

दी ये😆 (देऊन ये)

फफ्फटी😆 (मोटार सायकल )

*हे शब्द तुम्हाला फक्त एथच ऐकायला मिळतील.* 👍👍

Satpuda Ganesh Mandal Bhalod

Satpuda Ganesh Mandal Bhalod


विग्नहर्ता गणेश मंडळ भजेगल्ली

विग्नहर्ता गणेश मंडळ भजेगल्ली


रहस्यमय जगन्नाथ पुरी

🌷 *रहस्यमय जगन्नाथ पुरी* 🌷

    जगातली सर्वात मोठी रथयात्रा पुरीमध्ये भरते. पंढरपूरपेक्षा खूप अधिक भक्त ईथे एकत्र येतात. पुरीचे आणि इथल्या जगन्नाथाचे न उलगडलेले  रहस्य आणि भक्तांची श्रद्धा:-

     जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा पारध्याचा बाण लागून मृत्यू झाला तेव्हा पांडवांनी त्यांचे शरीर शोधून त्याचा दाहसंस्कार केला. इतर सर्व शरीर जळून गेले पण हृदय जळतच राहिले. नंतर तो पिंड नदीच्या पाण्यात सोडण्यात आला. त्या पिंडाचा त्या जळत्या हृदयामुळे एक लगदा तयार झाला. राजा इंद्रद्युम्न याला तो लगदा मिळाला, त्याने तो लगदा भगवान जगन्नाथाची मूर्ती तयार करून त्यात ठेवला आणि मंदिरात स्थापन केला.

दर १२ वर्षांनी भगवान जगन्नाथाची मूर्ती बदलली जाते, परंतु मूर्तीच्या आतील तो लगदा आजपर्यंत कोणीही पहिला नाही. जे पुजारी मूर्ती बदलतात त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते आणि हात सुद्धा कापडाने गुंडाळले जातात. त्यामुळे आजपर्यंत कोणीही त्या लगद्याला पाहू शकला नाही किंवा त्याचा स्पर्श अनुभवू शकला नाही!

 असे म्हटले जाते कि भगवंताच्या हृदयाच्या लगद्याला जो कोणी पहिल त्याचा  तात्काळ  मृत्यू होईल कारण त्या हृदयात ब्रह्मदेव आहे आणि प्रचंड तेज आहे जे कोणीही सहन करू शकणार नाही.

    ज्या दिवशी जगन्नाथाची मूर्ती बदलली जाणार असते त्यादिवशी सरकारकडून संपूर्ण पुरी शहरात वीज बंद करून अंधार केला जातो. 'मूर्तीत श्रीकृष्णाच्या हृदयाचा लगदा आहे का?' हि बाब एक रहस्यच आहे!

१> भगवान जगन्नाथाच्या मंदिरावरील ध्वज नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेला फडकतो, म्हणजे हवा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असेल तर झेंडा पश्चिमेकडून पूर्वेकडे फडकतो, असे का होते, हे शास्त्रज्ञ पण सांगू शकले नाहीत!

२> मंदिराच्या कळसाच्या ठिकाणी असलेले सुदर्शन चक्र पुरीमध्ये कुठेही उभा राहून पाहता येते आणि कुठूनही पहिले तरी असेच वाटणार कि हे सुदर्शन चक्र आपल्या समोरच आहे!

३> सर्वत्र पहिले तर असे आढळून येते की, दिवसा वारे समुद्राकडून जमिनीकडे येतात आणि रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहतात पण पुरी याला अपवाद आहे, इथे नेमकं याच्या उलटे होते दिवसा वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात!

४> भारतातल्या बहुतेक सर्व मंदिरांच्या शिखरांवर पक्षी बसलेले दिसून येतात परंतु जगन्नाथाच्या मंदिराच्या आजवरच्या इतिहासात एकही पक्षी मंदिर शिखर परिसरात फिरकला नाही!

५> मंदिराच्या सिंहद्वारातून आत प्रवेश करताच समुद्राचा आवाज येणे पूर्णपणे बंद होतो. मात्र संपूर्ण पुरीमध्ये अन्य कुठेही जावा, समुद्राचा आवाज येतच असतो!

६> अन्य बहुतांश मंदिरात श्रीकृष्ण आपल्या पत्नीसमवेत विराजमान असतात पण या मंदिरात मात्र ते आपले भाऊ बळराम आणि बहीण सुभद्रे सहित विराजमान आहेत!

७> मंदिराच्या शिखराची उंची २१४ फूट आहे मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिवसाच्या कोणत्याही क्षणी त्याची सावलीच कुठे  पडत नाही!

         *लीला अपरंपार*
         *जय  जगन्नाथ*

💐🌷🌹💐🌷🌹💐🌷🌹

जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे

*व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ;*
- संकलन-राजेंद्र बैरागी

१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट

७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!

नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!

जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!

*कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे.*  

*ग्रामपंचायत*

एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था.
आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.

* *गाव नमुना नंबर - 1* - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.

* *गाव नमुना नंबर - 1अ* - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.

* *गाव नमुना नंबर - 1ब* - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 1क* - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.

* *गाव नमुना नंबर - 1ड* - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 1इ* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 2* - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 3* - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.

* *गाव नमुना नंबर - 4* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 5* - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 6* - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 6अ* - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 6क* - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 6ड* - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 7* - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा,आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 7अ* - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 8अ* - या नोंद
वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 8ब, क व ड* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 9अ* - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 10* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 11* - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 12 व 15* - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 13* - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 14* - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 16* - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 17* - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 18* - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.

* *गाव नमुना नंबर - 19* - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 20* - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 21* - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.

अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते.
© Pravin Patrekar यांच्या वॉल वरून साभार

पिठल...

पिठल...
महाराष्ट्राच्या कुठल्याही घरात कधीही, केंव्हाही, अगदी कुठल्याही सुख दुःखात सदैव मदतीला धावून येणारा.. तत्पर असा हा एकमेव जिव्हाळ्याचा पदार्थ...
म्हणजे बघा एखाद्याच्या घरी मयत झाली असेल तर त्यांच्या दुखावट्यात अन्न म्हणून पिठल भात नेवुन देतात किंवा करतात....आणि दर गुरुवारी महाराजांना  प्रसाद म्हणून पिठल्याचाच नैवैद्य करतात...
बेसन हा या पिठल्याचा आत्मा...
पिठल्याचा तसा विशेष तामझाम काही नसतो....
पण याच्या जातकुळी सर्व दूर पसरलेल्या..
नांदेड जवळच्या एका दुर्गम भागात खाल्लेल पिठल आणि तेच कोकणातल्या खेड्यात चाखलेले पिठल एकाच प्रकारे बनवल असल तरी चव मात्र वेगवेगळी असते..हे मी अनुभवलेय...
तसे हा सर्वसामान्य पदार्थ असला तरी घरच्या गृहिणीला कधीही पटकन मदतीला धावून येणारा..
तसे याचे भाऊबंद खुप...म्हणजे बघा...
कांद्याच पिठ पेरुन केलल पिठल...लसणाच्या फोडणीचे पिठल....गोळ्याचे पिठल...वड्या पडतील अस केलेल पिठल ....तव्यावरचे पिठल.. घोटीव पिठल ...रावण पिठल...ताकातल पिठल....असे आणि कितीतरी प्रकार..
त्यातल्या त्यात म्हाळसाच्या हातच कांदा घालून केलेले घट्ट मऊ पिठल आणि मायानंदाच्या हातच वडया पाडून केलेले पिठल म्हणजे जिभेला पर्वणीच...
या कांद्याच्या मऊ घट्ट पिठल्यावर मस्त ताज़ी हिरवीगार कोथिंबीर पेरावी आणि त्यावर कच्च्या तेलाची चवी पुरती एक धार सोडावी...ते सगळ एकजीव करुन टम्म फुगलेल्या दुपदरी गरमागरम बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर एक घास तोंडात टाकला आणि तो जिभेवर पोहोचला की ब्रम्हानंद टाळी लागलीच म्हणून समजा...
प्रत्यक्ष ब्रम्हादेवालाही दुर्लभ असा हा मेनू ...
आणि त्या बरोबर तोंडी लावायला कांदा व हिरव्या मिरचीचा खरडा ( ठेचा नव्हे...खरडा वेगळा, ठेचा वेगळा...त्यावर एक स्वतंत्र लेख तयार आहे पण तो पुन्हा कधीतरी ) असेल तर खाणाऱ्याच्या दृष्टीने सुवर्ण कांचन योग...
हेच मऊ गरमागरम पिठल छान ताटात वाढून घ्याव ...बाजूला वाफाळलेला पांढराशुभ्र भात असावा...या पिठल्यावर अर्धा चमचा कच्या तेलाची धार सोडावी...आणि थोड़ा भात थोड़ पिठल अस एकत्र कालवत... एकजीव करत हळूहळू आस्वाद घेत खाण्याची मजा नुसती अवर्णनीयच...
सगळ पिठल आणि सगळा भात भसकन एकत्र करून खाण म्हणजे त्या पिठल्याचा अनादर केल्यासारख...
खरी मजा अशी लावून लावून खाण्यातच...
याच पिठल्यातला एक प्रकार म्हणजे तव्यावरच हिरवी मिरची लसुन याची फोडणी देवून केलेल पिठल...असल चमचमीत आणि खुसखुशीत असत की विचारु नका...हे तव्यावरच पिठल खाताना अगदी सहज त्यात असलेला खरपुस लसुन जेंव्हा दाताखाली येतोना तेंव्हा ती जी काय चव असते... त्याच वर्णन शब्दात होवुच शकत नाही...
सहलीला जाताना नेहमी उपयोगी येणारा हा पिठल्याचा प्रकार....
या तव्यावरच्या पिठल्याचा मधला भाग खावून संपला की त्या तव्याचा गोलाकार कडेला जो खरपुस खमंग भाग असतो तो खरवडून खायला जी मजा आहे ती दुसऱ्या कशात नाही...
लहानपणी आम्हा भावंडाची त्यासाठी नेहमी भांडणे व्हायची...
अर्थात हे तव्यावरच अस्सल जातिवंत पिठल खाव ते आपल्या आई किंवा आज्जी कडूनच ...त्यामागे त्यांचा चवीचा प्रदीर्घ अनुभव असतो..
आता हे पिठल तयार होत असताना ते तयार करणाऱ्या गृहिणीचा मूड पण फार महत्वाचा बर का...
रागात घोटून केलेले पिठल आणि प्रसन्न मनाने मन लावून घोटून केलेले पिठल या दोघांच्या चवीत जमीन अस्मानाचा फरक असतो...
तेंव्हा चविष्ट पिठल हवे असेल तर गृहलक्ष्मीचा मूड सांभाळला गेलाच पाहिजे...
कोकणात मिळते ते कुळीथाच पिठल ...त्याची चव वेगळी...ते भाकरी बरोबर खाताना एक वेगळीच मजा येते.
नुसतच पिठल भात खाण्यात जी मजा आहे ना ती कुठल्याही पंचतारांकित पदार्थात नाही... आणि हो... हे पिठल आणि त्याचे प्रकार म्हणजे पिठल भात वगैरे कुठल्याही हॉटेलात विकतही मिळत नाही...
असो

माता रेणुकाची उत्पत्ती रेणुकामाता माहूरगड

माता रेणुकाची उत्पत्ती रेणुकामाता माहूरगड

महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले
माहूरगड हे ठिकाण नांदेड जिल्ह्यात आहे. प्राचीन काळी
माहूरचे जंगल ‘ अमलीवन ‘ म्हणून प्रसिद्ध होते .माहूर हे प्राचीन
किल्ल्याचे ठिकाण, रेणुकामाता, दत्तात्रेय, अनसूयामाता या
तीन डोंगरावरील मंदिरांना सामावणारा माहूरचा हा
डोंगरकिल्ला गौंड या आदिवासी राज्याचा एकेकाळी
सत्तेचे केंद होता. या परिसराला सुमारे ६ मैल तटबंदी आहे,
किल्ल्यावर हत्तीदरवाजा, ब्रह्माकुंड, कारंजी, हौद यांचे
अवशेष त्याचे गत वैभवाची साक्ष देत उभे आहेत, १४२७ मध्ये
आदिवासी गोंडराजाचा पराभव करून अहमदशहाने माहूरगड
जिंकून घेतला . तेव्हा येथील मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली, पुढे
किल्लेदार जयसिंग ठाकूर याने रेणुकादेवीचा सभामंडप बांधला
.
या सभामंडपवजा मंदिरात प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने
मढवलेले आहे पुढे देवीची बैठक असुन देवीच्या बैठकीवर सिंहासन
कोरलेले आहे या बैठकीवर ५ फूट उंच व ४ फूट रुंद असा
रेणुकादेवीचा तांदळा आहे.
या ठिकाणा विषयी अनेक कथा प्रचलित आहेत.
भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची नगरी होती.
त्या नगरीत इश्वाकू राज्याचा पुत्र रेणू राजा राज्य करीत
होता रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी. शंकर-पार्वतीला
प्रसन्न करून कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला. त्या यज्ञकुंडातून
रेणुका प्रगटली. यथावकाश भागीरथीच्या तीरावर रेणुकेचे
स्वयंवर झाले व ती तपस्वी जमदग्नीची रेणुका भार्या झाली. ते
भागीरथी तीरावरील महोदय या नगरीत राहू लागले. त्यांचे
सोबत स्वयंवरात इंद्राने दिलेली कामधेनू हि होती, रेणुकेला
वसू, विश्वासू, बृहद्भानू, बृहत्कन्न आणि परशुराम ही मुले झाली.
रेणुका एकदा नदीवर गेली असता स्त्रियांसह मदनाचे रूप धारण
करणाऱ्या गंधर्वाला पाहून तीचे मनात कामूक भाव येतात ही
गोष्ट जमदग्नीला कळते तेव्हा ते क्रोधीत होतात व रेणुकेला
मृत्युदंडाची शिक्षा देतात व पुत्रांना तिची हत्या करण्यास
सांगतात. एकामागून एक चारही पुत्रांनी रेणुकेचा वध
करण्याची पित्याची आज्ञा नाकारताच जमदग्नी त्यांना
शाप देऊन ठार करतात.
पाचवा पुत्र परशुरामास आज्ञा करतात,पितृ आज्ञा म्हणून
परशुराम तत्काळ आपल्या परशुने रेणुकामातेचे शीर धडावेगळे
करतो. जमदग्नी प्रसन्न होतात. पितृवचनाचे पालन केल्यामुळे
परशुरामास वर मागण्यास सांगतात. मातृभक्त परशुराम
आपल्या मातेला व भावंडांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती
करतात. त्यांना क्रोधाचा पश्चाताप होतो व ते रेणुका व
पुत्रांस पुन्हा जिवंत करतात. व आपला क्रोध त्यागतात. पुढे
राजा सहस्त्रार्जुन जमदग्नी आश्रमात येतो. त्याला तेथे
असणार्या कामधेनू व तिच्या चमत्काराबद्दल कळते. तो
जमदग्नीकडे कामधेनूची मागणी करतो; .पण जमदग्नी कामधेनू
देण्यास असमर्थता दर्शवितात. तेव्हा राजा आश्रमावर हल्ला
करतो. सर्वांची हत्या करून रेणुकेला जखमी करून कामधेनूला
घेऊन जातो
नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून
परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली .
पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने
कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या
पारड्यात माता रेणुकेला बसवले . रानोमाळ भटकत अखेर तो
माहूरगडावर पोहचला . तिथे असलेल्या दत्तात्रेयाने त्याला
कोरी भूमी दाखवली परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व
सर्वतीर्थ निर्माण केले .या पाण्याने स्नान घालून व तेथेच
दत्तात्रेयांचे पौरोहित्या खाली परशुरामाने जमदग्नीवर
अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. त्यानंतर
परशुरामाला रेणुकेची खूप आठवण येऊ लागली . तो शोक करत
होता , तोच आकाशवाणी झाली . ‘ तुझी आई जमिनीतून वर
येऊन तुला दर्शन देईल .फक्त तू मागे पाहू नकोस .’ परंतु त्याने मागे
वळून बघितले . त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर
आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले. त्या तांदळारूपातल्या
मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर
मातेचे दर्शन झाले म्हणून याला ठिकाणाला मातापूर नाव
मिळाले पुढे त्याचे माहूर झाले.
या परिसरात महाकाली आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती
आहेत. खालील बाजूस परशुराम मंदिर, गणपती मंदिर,
पांडवतीर्थ , औदुबर झरा, अमृतकुंड, बोधतीर्थ, मातृतीर्थ,
रामतीर्थ , ऋणमोचनतीर्थ ही स्थळे आहेत.

खान्देशी भरीत, भरीत पार्टी, कळण्याच्या भाकरी

डिसेंबर, जानेवारी महिन्यात तुम्ही कधी  जळगावला आलात आणि भरताची चव न चाखताच परत गेलात, तर तुमची फेरी वाया गेली म्हणून समजा. तुमचे नातलग, मित्र जळगावी राहत असतील आणि त्यांनी तुमच्या पाहुणचारासाठी बामणोदहून आणलेल्या वांग्यांचे, आसोद्याच्या माणसाने तयार केलेल्या भरताचे जेवण ठेवले नाही, तर तुमच्या नातलगांचे, मित्राचे तुमच्यावर खरे प्रेम नाहीच, याची तुम्ही खूणगाठ बांधायला हरकत नाही. जळगावला येऊनही इथले भरीत खाऊ घालत नाही म्हणजे काय?
जळगावातली भरताची पांढरी, हिरवी वांगी आणि त्यांचे विशिष्ट पद्धतीने केलेले भरीत ही चीजच आहे तशी. वातावरणात थंडी असताना एखाद्या शेतात भरीत पार्टीला उपस्थित राहणे, हा इथे उत्सव असतो. अंगाला झोंबणारी थंडी, समोर केळीचे पान, त्यावर गरम गरम भरीत, शेजारी तशीच कळण्याची गरम गरम भाकरी, मुळ्याच्या फोडी आणि तोंडी लावायला दही घातलेली टोमॅटोची कोशिंबीर. आहाहाहा! असल्या पार्टीच्या आठवणीनेही अस्सल जळगावकर कासावीस होतो.
परवा सहज इंटरनेटवर ‘भरीत’ असा शब्द टाइप करून सर्च करण्याचा प्रयत्न केला तर ‘खान्देशी भरीत’ सर्व जगभर परिचित असल्याचे समोर आले. एका महिलेने तर भरताची रेसिपीच नेटवर टाकली आहे. त्यावर देशभरातल्या आणि विदेशात राहणा-या काही खवय्या नेटिझन्सनी मस्त चर्चाही घडवली आहे. अर्थात, ती रेसिपी आणि इथल्या भरीत बनवण्याच्या पद्धतीत खूप फरक आहे आणि तेच तर इथल्या भरताच्या चवीमागचे इंगित आहे.
खान्देशबाहेर या भरताला खान्देशी भरीत म्हणून ओळख आहे, तर खान्देशात जळगाव जिल्ह्याबाहेर जळगावचे भरीत म्हणून लौकिक आहे. जळगावकर मात्र भरतासाठी वांगी निवडतात ती बामणोदच्या शेतात पिकलेली. बामणोद हे भुसावळ-यावल रस्त्यावर लागणारे एक छोटेसे गाव आहे. आता इथून वांगी मोठ्या प्रमाणात थेट मुंबई-पुण्याला रवाना केली जातात. स्थानिक बाजारात 40 रुपये किलो दराने मिळणारी ही वांगी मुंबई-पुण्यात 60 ते 80 रुपये किलो दराने विकली जातात आणि त्यामुळे या लहानशा गावाचे अर्थकारणही बदलत चालले आहे. अर्थात, आता या वांग्यांचे लागवड क्षेत्र वाढत चालले आहे. जळगाव जिल्ह्यातले तापीकाठावरचे सर्वच तालुके ही वांगी पिकवतात. विदर्भातल्या थेट मलकापूरपर्यंत ही वांगी आता सहज उपलब्ध होताना दिसतात. हाच भाग आहे, जिथे लेवा पाटील समाज मोठ्या प्रमाणात राहतो. त्यामुळेच जळगाव जिल्ह्यात वांग्याचे भरीत हे लेवा पाटील समाजाचेच खाद्य म्हणून ओळखले जाते. याच समाजातली पुरुष मंडळी जसे भरीत बनवतात तसे अन्य कोणालाच बनवता येत नाही, असेही म्हणतात.
भरतासाठी वांगी भाजावी लागतात हे सर्वांनाच माहीत आहे; पण ही वांगी कापसाच्या काड्यांवर भाजल्यानेच भरताला खरी चव येते. ‘स्क्रिझोफेनिया’ ही गाजलेली कादंबरी लिहिणारे दिवाकर चौधरी यावल तालुक्यातल्या डांभुर्णीचे. ते सांगतात की तुम्हाला खान्देशी भरताची अस्सल चव पाहिजे असेल तर वांगी या काड्यांवरच भाजायला हवीत. भाजण्यापूर्वी त्यांना स्वच्छ काट्याने छिद्रे पाडून घ्यावीत. काड्यांच्या आगीत 10 ते 12 मिनिटांत वांगी भाजली जातात. त्यानंतर ती एका मोठ्या परातीत ठेवून त्यांचे काळे झालेले साल काढायचे. चांगल्या दर्जाच्या वांग्यांना भाजल्यानंतर भरपूर तेल सुटते. साल आणि देठ काढलेला वांग्यांचा गर एका लाकडी भांड्यात टाकला जातो. त्याला ‘बडजी’ म्हणतात. हा गर लाकडाच्याच मुसळासारख्या वस्तूने ठेचला जातो. त्यामुळे तो गर एकजीव होतो.
चविष्ट भरीत बनवण्यात जळगावपासून 4 किमी अंतरावर असलेल्या आसोदा या गावातले आचारी प्रसिद्ध आहेत. अनेक पिढ्यांची परंपरा तिथे आहे. किशोर वाणी हे नव्या पिढीतले भरतातले ‘मास्टर’. भरीत बनवून ते जळगावपासून थेट पुण्या-मुंबईतल्या हॉटेल्सपर्यंत सर्वांना पुरवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. लग्नसमारंभासाठीही त्यांना या दिवसात भरताच्या ऑर्डर्स मिळतात. ते म्हणतात की असे ठेचून एकजीव झालेल्या वांग्याच्या गराला फोडणी दिली जाते. फोडणीत तिखटाऐवजी भाजलेल्या मिरचीचा ठेचा टाकला जातो. त्यासाठी तिखट चवीची लवंगी मिरची वापरली जाते. चवीला तिखट असलेले भरीतच थंडीत मजा देते. कांद्याची पात भरतासाठी अत्यावश्यक असते. हिरवी पात चिरून तीही भरतात टाकली जाते आणि त्या पातीचे कांदे जेवताना तोंडी लावायला दिले जातात. खोबरे, शेंगदाणे हे फोडणीच्या वेळी तर ठेचलेला लसूण फोडणी दिल्यानंतर भरतात टाकावा, असा सल्लाही किशोर वाणी देतात. भरीत बाहेरगावी पाठवायचे असेल तर फोडणी न दिलेला गर पाठवावा लागतो. असा गर साधारण 12 तास चांगला राहतो, असा त्यांचा अनुभव आहे. भरताबरोबर असायला हवी कळण्याची भाकरी. कळणे म्हणजे ज्वारी आणि उडीद यांचे मिश्रण. साधारण 1 किलो ज्वारीत 200 ते 250 ग्रॅम उडीद टाकले म्हणजे कळणे तयार होते. आता कळण्याच्या भाकरीची जागा कळण्याच्या पु-यांनी घेतली आहे. अनेकदा भरीत पार्टीत कळण्याच्या पु-या केल्या जाऊ लागल्या आहेत.
पार्टीत भरीत उरलेच तर ते घरोघर पाठवले जाते. फ्रिजमध्ये ठेवले तर ते दुस-या दिवसापर्यंत चांगले राहते. शिळ्या भरताची भजी आणि भाकरी केली जाते. भरतात बेसन आणि मिरच्या टाकून त्या तळल्या की उत्तम भजी तयार होतात. भाकरी करण्यासाठी भरतात ज्वारीचे पीठ टाकून नेहमीसारखी भाकरी करता   येते. या भज्यांची आणि भाकरीची चव काही न्यारीच असते.
जळगाव जिल्ह्यात पिकणा-या या विशिष्ट प्रकारच्या वांग्यांची लागवड इतरत्र होत नाही आणि केली तरी त्यांना ती चव येत नाही, असा अनुभव आहे. या जातीवर संकर करण्याचा प्रयत्नही झाला आहे; पण संकरित वांग्यांमध्ये ती मजा नाही. त्यामुळे मूळ गावठी वाणाच्याच वांग्यांना मागणी असते. हे वाण किती जुने आहे, याबद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नाही. पण 15व्या शतकात होऊन गेलेल्या महानुभाव पंथाच्या कवी नारायण व्यास बहाळिये यांनी इथल्या भरताचा उल्लेख त्यांच्या कवितेत केला असल्याचे महानुभाव अभ्यासकांचे म्हणणे आहे.
बैंगन (वांगी) हा शब्द ‘बेगून’ या शब्दाचा अपभ्रंश असून बेगून म्हणजे कोणतेही गुण नसलेला, अशी माहितीही समोर आली; पण आहारतज्ज्ञ वांग्यांना बेगुणी किंवा निरुपयोगी मानायला तयार नाहीत. उलट डाएटरी फायबर वांग्यात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते उत्तम पाचक आहेत. त्यात असलेल्या क्लोरोजेनिक अ‍ॅसिडमुळे कॅन्सर आणि कुष्ठरोगालाही आळा बसतो, असे विज्ञान सांगते.

भालोद मित्र मंडळ, (ठाणे मुंबई परिसर) डोंबिवली चा स्नेह संमेलन मेळावा

भालोद मित्र मंडळ, (ठाणे मुंबई परिसर) डोंबिवली चा स्नेह संमेलन मेळावा
सर्वाना कळविण्यात येते की आपल्या भालोद मित्र मंडळ, (ठाणे मुंबई परिसर) डोंबिवली चा स्नेह संमेलन मेळावा दिनांक 8 जानेवारी 2017 रविवार रोजी श्री गावदेवी म्हाळसा मंदिर , कोपर (पश्चिम) डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला आहे . तरी आपण सहकुटुंब मित्र परिवार सह उपस्थित राहावे ही नम्र विनंती ।।

HISTORY OF LEVA PATIL

HISTORY OF LEVA PATILS
Lewa Patil :
The origin of Lewa Patils, at an essential time, came from defence duty (Kshatra Karma). At other times it means agriculture (Krushi Karma) and hence from the beginning they were treated as warriors (Kshatriya).

Lewa :
The sect which is the origin from 'Lava' is called Lewa. The lineage of Ikshwanku, Suryavanshi, living in Ayodhya established new city in Punjab. The name Lahore came from Lava. At present Lahore which is on the bank of Ravi is in Pakistan. This is the original place of Lava sect. The Lava sect which conquerred that part of Punjab is called Leva Region. The people there even now are called Leva. According to some authorities, Lava was born in the 40th generation of Survansh and according to some other authorities Lava was born to Sita from Ram in the 66th generation of Survansh.

After the conquest of region of Punjab Leva Pradesh of Lava sect was conquerred by Irani Gurjar Gang and so this part is known as 'Gujrat Subha'. The Leva Gurjars and Leva Kurmees living in Saurashtra at present have come from this area.

55 generations lived there after Lava. In 144 A.D. these Levas came from Punjab-Gujrat and Leva Province into Saurashtra and therefore Saurashtra got the name of Gujrat. But they left the Punjab in 78 B.C.

Patidar :
According to authorities the word Patidar has different meanings:

Patidar :
An officer of some part or area. According to Patel 'Pati' also means
group or branch during the regime of Mohammad Begada. The Kunbi means cultivator of the land. Therefore he did not give up the land. Patt means part of the land and Patidar means Tax Collector. Patil means chief of the village (Reference Dr. Soni's book page No. 69 if "Marathi Aadnave''.

The word Patil also came from 'Patkil'. Patu means Clever and patta means Chief. The person who established the village used to become Patil. Patil used to become known because of Village recognition. Patil was not a government post or self occupied post. Because of virtues and works, the person used to become Patil. Later on this post became hereditary. Patil became Village King and he got Government honour. Even after getting many posts - the Sardars means soldiers - did not give up Patilship.

Patilship was awarded because of career. This society of Kunbi being the ancestor of Lava and owner of the land is called as Patil. Thus Leva Patil became the name of the cast. Leva Kunbi, Leva Patil, Patidar, Kunbi, Rava, Rava Kunba etc. . Thus this cast is knows by the above names. The Leva Patils belonged to two province (Pargana). Khandesh province (Pargana) and Vidarbha provice (pargana). Each province (pargana) had Bhorgaon Panchayat. The head of this province (pargana) got government rights (Deshmukhi rights). The chief of Khandesh Leva Province (pargana) was Deshmukh, the Thorgavane Deshmukh of Yawal . The chief of Vidarbha Leva Province (Pargana) was Varade of Datala - Dudhalgaon Budruk. He was Vatandar Deshmukh.

In the Leva Pargana of Khandesh, the Thorgavane Deshmukh of Yawal lost recognition of his leadership. He remained the chief of Thorgavan branch and the Savadekar Leva branch of Khandesh, Navghare and Kandarkar - in these three branches the leadership went to Bhortek and thereafter it went to the Police Patil of Padalse. This change took place during the British regime and therefore Police Patil of Padlase did not get Deshmukhi. On the contrary, in Vidarbha Province Varade Panchayat chief of Datala, Dhudalgaon Budruk from Deshmukh family got it because of the confidence and support of Leva Patils. Datala Dudhalgaon Bk. chief named Varade got the leadership of Leva province of Vidharbha. The family chief (Kutumb Nayak) of Jat Panchayat and Deshmukhi continued with him but the Government dismissed Deshmukhi Vatan and so the work of Leva Panchat decreased day by day. The Family Chief of Bhor Panchyat of Deshmukhi of Leva Province became things of the past - Ref. Maharashtra State Gazatier, Dist. Jalgaon,